Blog Details

  • Home
  • स्वमग्नता : गरज जागरूकतेची
img img img
  • Dec 10, 2025
  • By admin
  • Comments Off on स्वमग्नता : गरज जागरूकतेची

स्वमग्नता : गरज जागरूकतेची

स्वमग्नता म्हणजेऑटिझम’, हा विषय दुर्लक्षित असला तरी त्यावर चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ही केवळ जागतिकच नव्हे, तर आपल्या देशातील वाढणारी समस्या आहे. ऑटिझमची वेळेत ओळख होणे आणि त्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे.

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरहे स्थिती

म्हणजे मेंदूच्या कार्यपद्धतीतील फरक, ज्यामुळे मुलांच्या सामाजिक, भावनिक आणि भाषिक विकासावर परिणाम होतो. या अवस्थेमुळे संवाद कौशल्यात, वर्तनात आणि सामाजिक परस्परक्रियेत अडचणी निर्माण होतात. देशात ऑटिझमबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने त्याचे निदान आणि उपचारात विलंब होतो. परिणामी मुलांच्या विकासात अडथळे निर्माण होतात.

आजाराची कारणे

अनुवंशिक कारणे : कुटुंबातील इतर सदस्यांना ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये ऑटिझमचा धोका अधिक आढळतो.

गर्भधारणेदरम्यानची कारणे :

  • आईचे वय जास्त असणे
  • मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार
  • गर्भावस्थेत जीवनशैलीतील चूका
  • औषधांचे दुष्परिणाम
  • व्हायरल इन्फेक्शन
  • वजन, झोपेच्या समस्या
  • प्रसूतीतील गुंतागुंत
  • कमी जन्म वजन

ही कारणेदेखील ऑटिझमची शक्यता वाढवू शकतात. आपल्या देशात स्क्रीनटाईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, लहान मुलांच्या भाषिक विकासावर त्याचा मोठा परिणाम दिसून देत आहे. तसेच काही सामाजिक घटकही कारणीभूत आहेत. जसे की
स्मार्टफोन, टॅब, टीव्ही यांचा अत्यधिक संपर्क, संवादात अडथळा निर्माण होणे, सामाजिक विकासात अडथळे येणे, यामुळे मुलांमध्ये भाषिक विकासाचा वेग कमी होत जातो. उशीरा प्रतिसाद देणे, एकाग्रतेचा अभाव, प्रकाशाकडे जास्त आकर्षित होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

अनेकशा पालकांना बालविकासातील महत्वाची टप्पे (milestones) लक्षात येत नाहीत किंवा ते दुर्लक्षित होतात. त्यामुळे वेळेत उपचार झाल्याने विकासात विलंब होण्याची शक्यता वाढते.

ऑटिझममुळे मुलांचे ओढून घेणे, नावाने हाक मारल्यास प्रतिसाद देणे, एकाच कृतीची पुनरावृत्ती करणे (repetitive behavior) यांसारखी लक्षणे दिसतात. काही मुलांमध्ये संवेदनशीलतेचे प्रमाण खूप जास्त असते. पथ्य, प्रकाश, आवाज किंवा स्पर्शामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी पालकांनी संयम बाळगून उपचार आणि व्यावसायिक मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कायदेषीर संरक्षण

२०१६ च्या अपंग व्यक्तांच्या हक्क कायद्यानुसारस्वमग्नताही अपंगत्वाच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. यामुळे पीडित व्यक्तींना शैक्षणिक, रोजगार, विविध प्रशिक्षण, पुनर्वसन आणि सामाजिकआर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑटिझम असलेल्या मुलांसाठी आवश्यक सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारतर्फे दिले जाणारेऑटिझम सर्टिफिकेटघेणेही उपयुक्त ठरते. ते मिळाल्यास पालकांना मुलांच्या शिक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळते.

Sakal Pune 

19th February2025